न्यायव्यवस्थेने इतके अतिसंवेदनशील का असावे? न्यायनिवाड्यावर लोकांना टीका करण्याचा हक्क! एनसीईआरटीवर संतापलेल्या सरन्यायाधीशांनी सूर बदलला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुस्तकात न्यायालयीन भ्रष्टाचाराबाबत भाष्य केल्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेवर (एनसीईआरटी) संतापलेले सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी शुक्रवारी आपला सूर बदलला. न्यायव्यवस्थेने इतके अतिसंवेदनशील का असावे? लोकांना न्यायनिवाडय़ांवर टीका करण्याचा अधिकार आहे, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली. आठवीच्या जुन्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकातून न्यायालयीन निकालांवर टीका करणारा उतारा वगळण्याची मागणी करणाऱया याचिकेत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने यावेळी नकार दिला.

‘अलीकडील काही निकालांमध्ये झोपडपट्टीवासीयांकडे शहरात अतिक्रमण करणारे म्हणून पाहण्याचा कल दिसून येतो,’ या न्यायालयाच्या अभिप्रायावर याचिकेद्वारे आक्षेप घेण्यात आला होता. याचिकेवर शुक्रवारी सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने यापूर्वी एनसीईआरटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. किंबहुना, एनसीईआरटीच्या नव्या पुस्तकातील न्यायालयासंबंधीत परिच्छेद वगळण्याचे निर्देश देत पुस्तक वितरणावर बंदी घातली होती. मात्र एनसीईआरटीच्या दुसऱया वादावर सुनावणी घेताना सरन्यायाधीशानी सूर बदलला.