
तेलाची फोडणी, गरम वाफा, धूर, धुळ, कोंदट गरम हवा बाहेर फेकल्याने प्रत्येक किचनमधील एक्झॉस्ट फॅनवर तेलकट आणि चिकट राब बसतो. तो साफ करणे खूप कठीण होते.
साबण किंवा रासायनिक क्लीनर्स वापरण्यापेक्षा स्वयंपाकघरातील बेकिंग सोडा, लिंबू आणि अगदी टूथपेस्टचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते.
हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे लावून ठेवल्यास चिकट थर सैल होतो आणि पंख्याला नवीन सारखी चमकही मिळते. योग्य पद्धत वापरल्यास अवघ्या काही मिनिटांत हा पंखा स्वच्छ होऊ शकतो.
























































