
मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे कार्यासन अधिकारी किरण शार्दूल यांनी लिहिलेल्या ‘किरणोत्सव’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शार्दूल यांनी आपल्या पुस्तकात सरकारी सेवा बजावत असताना आलेले प्रशासनिक अनुभव शब्दबद्ध केले आहेत. मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या नवलेखक अनुदान योजनेच्या अंतर्गत शार्दूल यांच्या पुस्तकाची निवड करण्यात आली असून ठाण्याच्या अनघा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.


























































