
नैरोबीहून मुंबईत कोकेनची तस्करी करणाऱ्या महिलेला डीआरआयने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली आहे. महिलेकडून द्रव स्वरुपातील कोकेन जप्त केले आहे. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 20 कोटी रुपये आहे.
सदर महिला नैरोबीहून मुंबईत आली होती. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच तपासणी करताना महिलेच्या बॅगेत दोन शॅम्पू आणि लोशनच्या बाटल्या आढळल्या. या बाटल्यांची तपासणी केली असता त्यात 1,983 ग्रॅम द्रव पदार्थ आढळला. या पदार्थाची चाचणी केल्यानंतर हे कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर महिलेला अटक केली आहे.