आचारसंहिता 20 किंवा 22 डिसेंबरला, चंद्रकांत पाटलांनी केली घोषणा

राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करण्याआधीच राज्याचे उच्च व तंत्रिशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालिका निवडणुकांची घोषणा करून टाकली. राज्यात 20 किंवा 22 डिसेंबरला पालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, दिवाळीनंतर जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका होतील असे विधान या आधी चंद्रकांतदादांनी केले होते.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आज ंिपंपरी-चिंचवडमधील भाजप पदाधिकाऱयांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी 20 किंवा 22 डिसेंबरला निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यासाठी पक्षाच्या उमेदवारीसाठी पुढील चार दिवस अर्जांचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी पालिका निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत तारखाच जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे.