वक्फ बोर्ड विधेयकाबाबत 44 सुधारणा फेटाळल्या, केवळ सत्ताधाऱ्यांच्या 12 सुधारणा मंजूर; विरोधकांमध्ये संतापाचे वातावरण

प्रस्तावित वक्फ बोर्ड विधेयकावर सखोल चर्चा करण्यासाठी ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी या विधेयकाबाबत झालेल्या बैठकीत खडाजंगी झाली. त्यानंतर आज झालेल्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत विधेयकासंदर्भात सत्ताधाऱयांनी मांडलेल्या 12 सुधारणा मंजूर करण्यात आल्या. तर विरोधी खासदारांनी मांडलेल्या 44 सुधारणा फेटाळण्यात आल्या. त्यामुळे विरोधकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्यावर हुकूमशाही कारभार करत असल्याचा आरोप विरोधी खासदारांकडून करण्यात आला. त्यामुळे गोंधळ घालणाऱया 10 खासदारांना निलंबित करण्यात आले होते.

आधी जमिनीच्या मालकीसंदर्भात निर्णय घेण्याबाबतचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱयांकडे होते. आता राज्य सरकारमार्फत नेमलेल्या व्यक्तीकडे हे अधिकार असतील, मग ती व्यक्ती आयुक्त असो वा सचिव असे जगदंबिका पाल यांनी म्हटले आहे. याशिवाय वक्फ बोर्डाच्या रचनेसंदर्भात एक सुधारणा मंजूर करण्यात आली. आधी वक्फ बोर्डावर दोनच सदस्य होते.