माकपचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड लहानू कोम यांचे निधन, आदिवासी समाजासाठी भरीव योगदान

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहानू कोम यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. 1959 पासून ते पक्षाच्या माध्यमातून काम करत होते. आत पहाटे साडे पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

लहानू कोम हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 1959 पासूनचे कार्यकर्ते होते. तसेच ते माजी आमदार, माजी खासदार माजी राज्य सचिवमंडळ सदस्य, अखिल भारतीय किसान सभेचे माजी राज्य उपाध्यक्ष होते. तसेच लाखो आदिवासी मुलामुलींना गेली सहा दशके शिक्षण देणाऱ्या आदिवासी प्रगती मंडळ या संस्थेचे 1962 पासून अध्यक्षही होते.

गेले 10 दिवस कॉम्रेड लहानू कोम एका खासगी इस्पितळात आय.सी.यू. मध्ये होते. मृत्युसमयी त्यांचे वय 86 वर्षे होते. त्यांच्यामागे पत्नी हेमलता, पुत्र सुबोध, सून सुजाता, नातू तुषार, कन्या सुनंदा, जावई हरिश्चंद्र खुलात, नातू विजय आणि नात रुचिता असा परिवार आहे. कॉम्रेड लहानू कोम यांची अंत्ययात्रा उद्या गुरुवार, दिनांक 29 मे रोजी दुपारी 12 वाजता पालघर जिल्ह्यात तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर भवन या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यालयातून निघेल.