एआय नोकऱ्यांसाठी हुशार उमेदवार मिळेना, 10 पैकी केवळ एकच इंजिनीअर पात्र

एकीकडे एआयचा प्रभाव वाढत आहे, मात्र त्या तुलनेत हिंदुस्थानच्या जॉब मार्केटमध्ये कुशल मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. एआय आधारित नोकऱ्यांमध्ये प्रतिभावंत उमेदवारांची कमी दिसून येतेय. एआयच्या 10 रिक्त पदांसाठी कंपन्यांना केवळ एक पात्र  इंजिनीअर सापडत आहे. ‘टीमलीज’च्या डिजिटल स्कील अँड सॅलरी प्रायमर रिपोर्टमधून ही माहिती समोर आलीय. सध्याच्या काळात तमाम उद्योगपतींनी एआयकडे मोर्चा वळवला आहे. 2025 अखेरपर्यंत एआयचे बाजार मूल्य 45 टक्क्यांच्या कंपाऊंड ऍन्युअल ग्रोथसह 28.8 अब्ज डॉलरपर्यंत पोचेल, असा अंदाज आहे.

n नोकऱ्यांच्या बाजारात एआयमुळे खूप बदल होण्याची शक्यता आहे. आयटी सेक्टर, ग्राहक अनुभव, बँकिंग, स्वास्थ सेवेसह अनेक क्षेत्रांत जागतिक स्तरावर 40 टक्के नोकऱ्यांवर परिणाम होईल. अनेक उद्योगांमध्ये एआय आधारित लार्ंनग मॉडेल, डिजिटल साक्षरता यांना प्राधान्य दिले जात आहे.