पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी काँग्रेसकडून समन्वयकांची नियुक्ती

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 2026मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. यासाठी कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मतदारसंघनिहाय समन्वयांची नियुक्ती केली आहे.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर नागपूर पदवीधरची जबाबदारी विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ डॉ. सुनील देशमुख, अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी एम.एम. शेख यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.