पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची 34 जणांची समिती; भाई जगताप, नसीम खान यांना स्थान नाही

मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक व्यवस्थापन व समन्वयासाठी 34 जणांची समिती स्थापना करण्यात आली आहे. पण या समितीमध्ये माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप, खासदार चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे काँग्रेसमधील वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.

मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या या समितीत माजी मंत्री आणि आमदार अस्लम शेख, आमदार अमीन पटेल, ज्योती गायकवाड, अमरजीत मनहास, माजी आमदार मधू चव्हाण, माजी आमदार अशोक जाधव, सचिन सावंत, गणेश यादव यांचा समावेश आहे. याशिवाय उपेंद्र दोशी, शीतल म्हात्रे, अजंठा यादव, सुरेश कोपरकर यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.