मिंधे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी भरसभेत महिलांबद्दल अपशब्द काढले. त्यावरून गोगावले यांच्यावर चौफेर टीका होत आहे. आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या फेकसेनेचा हा खरा चेहरा आहे अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच बहिणीची अब्रू महत्वाची की खुर्चीसाठी तुम्हाला पाठिंबा देणारा आमदार महत्वाचा हे आज राज्याला दाखवून द्या असे आव्हानही वडेट्टीवार यांनी दिले.
एका सभेत बोलताना भरत गोगावले म्हणाले की तुम्हाला काम करणारा भाऊ हवाय की &^%$ बनवणारी बहीण हवीये. या विधानवरून गोगावले यांच्यावर चौफेर टीका झाली. आता राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.
एक्सवर पोस्ट करून वडेट्टीवार म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या फेकसेनेचा हा खरा चेहरा आहे! मतांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण म्हणून इव्हेंट करत आहे. दुसरीकडे त्यांच्या पक्षाचा आमदार एका महिलेला भर सभेत शिव्या घालत आहे. मुख्यमंत्री महोदय, तुमच्या लाडक्या बहिणीला शिव्या घालणाऱ्या भरत गोगावले यांच्यावर कारवाई करून दाखवा. बहिणीची अब्रू महत्वाची की खुर्चीसाठी तुम्हाला पाठिंबा देणारा आमदार महत्वाचा हे आज राज्याला दाखवून द्या असे आव्हान वडेट्टीवार यांनी दिले आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या फेकसेनेचा हा खरा चेहरा आहे!
मतांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण म्हणून इव्हेंट करत आहे. दुसरीकडे त्यांच्या पक्षाचा आमदार एका महिलेला भर सभेत शिव्या घालत आहे.
मुख्यमंत्री महोदय, तुमच्या लाडक्या बहिणीला शिव्या घालणाऱ्या भरत गोगावले यांच्यावर कारवाई करून… pic.twitter.com/wHskj5QbAx
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 11, 2024