
राज्य निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपला फायदा व्हावा, अशी भूमिका घेत आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. तसेच विरोधी पक्षांनी मतदार यादीतील त्रुट्या दाखवून दिल्या तरी आयोग त्याची दखल घेत नाही ज्ञानेश कुमार तोंड लपवून का बसले आहेत? असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.
एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपला फायदा व्हावा, अशी भूमिका घेत आहे. त्यामुळे देशातील आणि राज्यातील निवडणुका केवळ एक फार्स ठरत आहेत. आयोग संविधानविरोधी भूमिका घेत असून आपली जबाबदारी झटकत आहे. विरोधी पक्षांनी मतदार यादीतील त्रुट्या दाखवून दिल्या तरी आयोग त्याची दखल घेत नाही. काँग्रेस पक्षाची ठाम मागणी आहे की चुका दुरुस्त करूनच निवडणुका घ्याव्यात.
तसेच आयोगाची भाजपला फायदा करून देणारी भूमिका लोकशाहीसाठी घातक ठरत आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांना सांगितले होते की, 7 दिवसांत प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणुकीवरील आक्षेप सादर करा, अन्यथा कारवाई केली जाईल. मग आता ते ज्ञानेश कुमार तोंड लपवून का बसले आहेत? असेही सपकाळ म्हणाले.