लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला संकेत मिळाला होता. आता नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल आणि त्यांना निरोपाचा शेवटचा संकेत मिळेल, असे विधान काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जयराम रमेश यांनी भाजप पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी 4 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला संकेत मिळाला की त्यांची वेळ संपली आहे. आपल्याला जाण्याची तयारी करावी लागेल हे त्यांना कळालं. 8 ऑक्टोबरला (जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल ) त्यांना दुसरा संकेत मिळेल. महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीचे निकाल येतील. नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांना तिसरा आणि संकेत मिळेल, असेही जयराम रमेश म्हणाले.
#WATCH | Delhi | Congress leader Jairam Ramesh says, “On June 4, 2024, the PM had received the first signal that his time was up and he should prepare to leave. On October 8, he will receive the second signal. Then, after the results of the Maharashtra and Jharkhand Assembly… pic.twitter.com/smoqWACcbC
— ANI (@ANI) October 2, 2024