वोट जिहादची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना लाज वाटली पाहिजे, नाना पटोलेंची टीका

वोट जिहादची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना लाज वाटली पाहिजे अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली. तसेच फडणवीसांना माफी मागावी अशी मागणीही पटोले यांनी केली.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहादची भाषा केली होती. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपकडून मतांच राजकारण सुरू आहे. वोट जिहादची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. फडणवीस साडे सात वर्षांहून अधिक काळ गृहमंत्री आहेत, संविधानिक पदावर आहेत. जर ते मतांना वोट जिहाद म्हणत असतील तर याचा अर्थ ते संविधानाला मानणारे लोक नाहीत. राहता राहिला लव्ह जिहादचा प्रश्न तर लव्ह जिहादचे किती प्रकरण घडले, किती कारवाई झाल्या याची माहिती द्यावी असे पटोले म्हणाले.

 

तसेच निवडणुकीच्या आधी अशी जुमलेबाजी करणे आणि धर्माच्या नावावर भांडणं लावण्याची कामे भाजप नेते करतात. भाजप नेते खालच्या पातळीचं राजकारण करतात. यासाठी फडणवीसांनी माफी मागावी. संविधानिक पदावर बसून अशी विधानं करणे हे शाहु फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात चालणार नाही असेही पटोले म्हणाले.