काँग्रेस नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलीकडेच जम्मू-कश्मीरमध्ये काही तरुण विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी कश्मिरी युवतींनी राहुल गांधी यांना लग्नाबाबत प्रश्न विचारला, यावर उत्तर देताना नियोजन नाही, झाले तर ठीक. गेल्या 20 ते 30 वर्षांपासून मी या दबावातून बाहेर आलो आहे, असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले.
मला राज्यशास्त्र विषय आवडतो, असे एका युवतीने सांगताच, माझा राज्यशास्त्राविषयीचा अनुभव असा आहे की, तुम्हाला जे शिकवले जाते त्याचा खऱ्या राजकारणाशी काहीच संबंध नाही असे राहुल गांधी म्हणाले.