
राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना नागपूर येथून विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्ली येथे नेण्यात आले आहे.
27 मेरोजी खासदार धानोरकर यांचे वडिल नारायण धानोकर यांचे निधन झाले होते, 28 मे रोजी नारायण धानोरकर यांच्या अंत्यविधीमध्येही बाळू धानोरकर उपस्थित राहू शकले नाहीत. मागील 2 दिवसांपासून बाळू धानोरकर यांच्यावर नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज प्रकृती काही प्रमाणात खालावल्याने त्यांना तात्काळ दिल्ली येथे उपचारासाठी नेण्यात आले. सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर हे चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार आहेत.