
धारावीकरांचा उपयोग करून मुंबईत व्होट जिहाद केला जात आहे असे विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी केले होते. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी शेलार यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. तसेच निवडणूक आयोगाने शेलार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
The Chief Election Officer of Maharashtra had said that he shall be taking action against the use of words like Vote Jihad as the Model Code of Conduct is now in force. The Mumbai BJP chief @ShelarAshish while speaking about Dharavi redevelopment today, used the term Vote Jihad.… pic.twitter.com/DqLsrBwZNb
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 19, 2024
गायकवाड यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून म्हटले आहे की, राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेते व्होट जिहाद असा शब्दप्रयोग करून एका विशिष्ट धर्माचा अपमान करत आहेत. निवडणुकीत कोणी कोणाला मतदान करायचे हा त्या मतदाराचा अधिकार आहे. जर एखाद्या मतदाराने किंवा काही भागातील बहुसंख्य मतदारांनी मतदान केले असेल तर त्याला व्होट जिहाद म्हणण्याचा कोणालाही अधिकार नाही. संविधानाने मतदाराला दिलेल्या हक्क व अधिकाराचे हे उल्लंघन आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या एका पत्रकार परिषदतच व्होट जिहाद सारखे विधाने केल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल असे आपण जाहीर केले होते. भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष श्री. आशिष शेलार यांनी दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, “धारावी पुनर्विकासाचा उपयोग करून तिथल्या रहिवाशांची माथी भडकवून, धारावीकरांचा उपयोग करून मुंबईत व्होट जिहाद केला जात आहे.” असे विधान केले आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते अशा पद्धतीने विशिष्ट धर्माच्या लोकांना जाणीवपूर्वक टार्गेट करत आहेत. संविधानाने त्यांना दिलेल्या मतदानाच्या हक्कावर गदा आणत आहेत. अशा प्रकारे विधान करून भाजपा धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. श्री. आशिष शेलार यांच्या विधानाची आपण गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी विनंती गायकवाड यांनी केली आहे.
घ्या.. पुन्हा एकदा अदानींचे एजंट बरळले. अदानींच्या स्वार्थासाठी आता हे नालायक सरकारचे एजंट जनतेला चक्क अर्बन नक्षलवादी म्हणाले. हे बोलताना जरा लाज-शरम वाटायला हवी होती. सत्तेच्या मस्तीत इतपर्यंत यांची मजल गेली. मुंबईत उघड-उघड होणाऱ्या जमिनींच्या लूटवर हे पडदा टाकत आहेत. मी जे… https://t.co/khnSpo7JzX
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 19, 2024