रेल्वे सेवा कमकुवत झाल्यानेच अपघात वाढले; मल्लिकार्जुन खरगे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

वाढत्या रेल्वे अपघाताबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. रेल्वेला वेळेवर पैसे मिळत नाहीत, तसेच तांत्रिक पदेही भरली जात नाहीत. यामुळे रेल्वे सेवा कमकुवत होत आहे आणि त्यामुळेच अपघात होत असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी सरकारने विचार करायला हवा असेही खरगे म्हणाले आहेत.

मल्लिकार्जुन खरगे यांनी एएनआयशी संवाद साधताना सांगितले की, रेल्वे सेवा कमकुवत झाल्याने रेल्वेचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. रेल्वे विभागात लाखो पदे रिक्त आहेत. जर महत्वाची तांत्रिक पदे रिक्त असतील तर रेल्वे साहजिकच कमकुवत होईल.

खरगे म्हणाले की, रेल्वे विभाग एवढा कमकुवत झाला आहे की, एकापाठोपाठ एक दुर्घटना होत आहेत. रेल्वे विभागाला विळेवर पैसे दिल जात नाही. जेव्हा रेल्वेचे अर्थखात्यात विलीनीकरण झाले नव्हते तेव्हा ते स्वतःच काम करायचे आणि जेव्हा त्यांना कशाचीही गरज पडली तर तेव्हा ते केंद्र सरकारकडे मागायचे. शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे, सरकारने याचा विचार करावा, अन्यथा जनता त्यांना धडा शिकवेल.