महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून काँग्रेसचे आंदोलन, वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा प्रयत्न

फलटणमध्ये एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केली होती. या महिलेने हातावर एका पोलीस अधिकाऱ्याचे आणि माजी खासदाराचाही उल्लेख केला होता. या प्रकरणी महिलेला न्याय मिळावा म्हणून काँग्रेसने मुंबईत आंदोलन केले आहे.

युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत आले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. नरिमन पॉईंटवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडत रास्तारोको केला होता. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना धरून गाडीत टाकण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा कार्यकर्ते आमि पोलिसांत झटापट झाली. यावेळी कार्यकर्ते हटण्याच्या मनःस्थितीत नव्हते. सरकारने एसआयटी स्थापन करून या प्रकरणाचा तपास करावा आणि महिलेला न्याय द्यावा अशी प्रमुख मागणी काँग्रेसने केली होती.