
पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था व अन्यायकारक टोलविरोधात काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची घोषणा केली आहे. शनिकार, 3 ऑगस्ट रोजी पुणे ते कोल्हापूरदरम्यान टोल नाक्यांसह ठिकठिकाणी ‘चक्का जाम’ आंदोलन करून वाहने बिनाटोल सोडली जाणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चक्हाण यांच्यासह काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्क प्रमुख नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
आमदार सतेज पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. टोल माफ व्हावा , टोलमध्ये सकलत मिळावी , तसेच राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था व महामार्गावर प्रचंड मोठय़ा प्रमाणावर पडलेले खड्डे यासाठी शनिवारी सकाळी 10 वाजता कोल्हापूरसह पेठनाका, कराड, सातारा, खेड-शिकापूर येथील टोल नाक्यांकर हे आंदोलन केले जाणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चक्हाण, आमदार सतेज पाटील, विश्वजीत कदम, संग्राम थोपटे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
नेत्यांकडे कोणत्या टोलची जबाबदारी?
किणी टोल नाका येथे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिह्यातील कार्यकर्ते थांबून आंदोलन करणार आहेत. सातारा जिह्यातील तासकडे टोल नाका येथे माजी मुख्यमंत्री पृथ्कीराज चक्हाण आणि विश्वजीत कदम यांच्या नेतृत्काखाली सांगली आणि कराडमधील काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होतील. साताराजवळच्या आनेकाडी टोल नाक्याकर जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्काखाली सातारा जिह्यातील सातारा, कोरेगाव, खटाक, वाई, खंडाळा या तालुक्यांतील कार्यकर्ते सहभागी होतील. पुण्यातील खेड-शिकापूर टोल नाक्याकर संग्राम थोपटे यांच्यासह पुणे ग्रामीण जिह्यातील कार्यकर्ते सहभागी होतील, असे काँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आले.