
गॅस सिलिंडरच्या महागाईच्या मुद्दय़ावरून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘आमच्याकडे पुरेसा इंधन साठा आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा हिंदुस्थानला फरक पडणार नाही, असे म्हणणारी मोदींची एपस्टीन गँग आता कुठल्या बिळात लपलीय,’ असा टोला काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी हाणला.
‘आखातातील युद्धाचा परिणाम आपल्या देशावर होईल हे खुद्द अर्थ मंत्रालयाच्या मासिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे वारंवार इशारा देत होते, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आपले परराष्ट्र धोरण सपशेल फेल झाले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी इराणने फक्त रशिया आणि चीनसाठी खुली केली. हिंदुस्थानला ती सवलत दिली गेली असती तर गॅसचा तुटवडा आणि महागाई झालीच नसती, याकडे श्रीनेत यांनी लक्ष वेधले.





























































