
सोलापूरमध्ये मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच आता अकोल्यात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकोला जिह्यातील अकोट तालुक्यातील मोहाळा गावात त्यांच्यावर हा हल्ला झाला. हिदायत पटेल यांच्यावर हा हल्ला कोणी केला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हिदायत पटेल हे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते.





























































