
सामना ऑनलाईन । वर्धा
वर्ध्यात प्रदेश युवक काँग्रेसने पोस्टर वॉरला सुरवात केली आहे. जिल्ह्यात ठिक ठिकाणी पोस्टर, भीत्तीपत्रे लाऊन काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे “गली गली मे शोर है, देश का चौकीदार चोर है” असं म्हणत काँग्रेस आक्रमक होतांना दिसत आहे. गांधी जयंतीला जिल्ह्यात दोन्ही पक्षांच्या वतीने पदयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या शक्ती प्रदर्शनातून गांधी जयंतीला भाजप आणि काँग्रेस आमने सामने येत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.



























































