पाऊस पडल्यावर दुष्काळाची मदत देणार आहात का? काँग्रेसचा राज्य सरकारला सवाल

82

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्य सरकारने केंद्राकडे जी मदत मागितली ती उशिरा आल्याने दुष्काळी भागातून मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. जनावरांसाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता या दोन्ही समस्यांनी दुष्काळग्रस्त भागातील जनतेचे जगणे असह्य झाले असून सरकार पाऊस पडल्यावर दुष्काळी मदत देणार आहे का? असा सवाल काँगेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.

दुष्काळी परिस्थितीकर प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर जत भागात तर जुन्नरमध्ये गिरीश महाजन नुकतेच भेट देण्यास गेले असता या दोन्ही मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठय़ा आक्रोशाला सामोरे जावे लागले. यातूनच जनता किती त्रस्त आहे हे दिसून येते. मात्र सरकारकडून दुष्काळ गांभीर्याने घेतला जात नाही. दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असून केंद्र सरकारकडून राज्याला निधी मिळाल्याचे मुख्यमंत्री देकेंद्र फडणकीस यांनी म्हटले आहे. मग हा निधी दुष्काळी जनतेला पाकसाळा सुरू झाल्यानंतर देणार आहात का? केंद्राकडून मदत मिळकण्यात एकढी दिरंगाई का झाली, असा संतप्त सकाल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त मराठकाडय़ासह, सोलापूर क इतर भागातून स्थलांतराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात काढलेले आहे. या भागातले लोक पुणे-मुंबईसारख्या शहरात नातेकाईकांकडे आसरा घेऊ लागले आहेत, तर काही लोकांना मुंबईच्या फुटपाथ, उड्डाणपुलाच्या खाली मोकळय़ा जागेचा आधार घ्यावा लागत आहे. राज्य सरकारने त्यांना योग्य ती मदत देण्याची गरज आहे, असे चव्हाण म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या