
पश्चिम सिंहभूम शंकराचार्य अविमुत्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे असून यामागे राजकीय कट असल्याचा दावा द्वारका शारदापीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांनी केला आहे. सनातन धर्माच्या आचार्यांना बदनाम करण्याचा हा कट असून गोहत्येसारख्या संवेदनशील विषयांवर आवाज उठवल्यानंतर अशा प्रकारचे आरोप करण्यात येतात, असे स्वामी सदानंद सरस्वती यांनी सांगितले. पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील मनोहरपूर परिसरातील विश्व कल्याण आश्रमात एका कार्यक्रमासाठी स्वामी सदानंद सरस्वती यांची उपस्थिती होती. त्या वेळी प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.


























































