
सोशल मीडियाच्या या जगात हिंदुस्थानातील कंटेंट निर्मात्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केली आहे. यूट्यूबने हिंदुस्थानातील कंटेंट क्रिएटर्स, कलाकार आणि मीडिया कंपन्यांच्या वाढीला गती देण्यासाठी 850 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. गेल्या तीन वर्षांत यूट्यूबने हिंदुस्थानातील कंटेंट निर्मात्यांना तब्बल 21 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे दिले असल्याचे यूट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नील मोहन यांनी सांगितले. हिंदुस्थानातील कंटेंटला जगभरात पसंती मिळत असून गेल्या वर्षी हिंदुस्थानात तयार केलेला व्हिडीओ कंटेंट देशाबाहेरील प्रेक्षकांनी 45 अब्ज तास पाहिला. यूट्यूब कंटेंट निर्माते जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांसोबत इतिहास, संस्कृती आणि माहिती शेअर करण्याचे काम करतात.