कोस्टल रोडसाठी पावसाळय़ात पालिकेचे तीन कंट्रोल रूम

98
coastal-road-for-mumbai

सामना ऑनलाईन, मुंबई

कोस्टल रोडसाठी पावसाळ्यात पालिकेने तीन कंट्रोल रूम सुरू केले आहेत. त्यामुळे कोस्टल रोड दरम्यान कुठेही पाणी साचल्यास थेट संपर्क साधता येणार आहे. हे कक्ष पालिकेच्या मुख्य कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी जोडलेले असतील. प्रकल्पाच्या ठिकाणी पाणी साचल्यास मुख्य नियंत्रण कक्षाच्या ‘1916’ या दूरध्वनीवर तक्रार नोंदवावी किंवा त्याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहन पालिकेच्या सागरी किनारा रस्त्याचे प्रमुख अभियंता मोहन माचिवाल यांनी केले आहे.

दक्षिण मुंबईतील ‘शामलदास गांधी मार्ग’ (प्रिन्सेस स्ट्रीट ) ते ‘राजीव गांधी सागरी सेतू’ यांना जोडणारा 9.98 कि.मी. लांबीचा ‘सागरी किनारा रस्ता’ (कोस्टल रोड) पालिकेचा महत्त्वाचा आणि विविध घटक असलेला देशातील या प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम सुरू असून येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी कंत्राटदारांच्या स्तरावर घेतली जात आहे. तसेच महापालिकेच्या किनारी रस्ता खात्याद्वारे याबाबत आवश्यक ते पर्यवेक्षणही नियमितपणे केले जात आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रियदर्शिनी उद्यान, अमरसन्स उद्यान व वरळी डेअरी या तीन ठिकाणांच्या जवळ हे नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत.

या ठिकाणी करा संपर्क

‘कोस्टल रोड’च्या ‘पॅकेज-1’करिता अमरसन्स उद्यानाजवळ उभारण्यात आलेल्या नियंत्रणात कक्षाचा आपत्कालीन क्रमांक 022–2361-0221 असा आहे. तसेच राकेश सिंग सिसोदिया व एच.एम. भद्री या नियंत्रण कक्षाच्या संपर्क अधिकाऱ्यांशी अनुक्रमे 9167-061-106 व 8239-567-841 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येऊ शकेल.

 प्रकल्प व्यवस्थापक देवेंद्रप्रसाद व निवासी अभियंता राजेश यादव यांच्याशी अनुक्रमे 9967-014-362 व 9702-467-575 या भ्रमणध्वनी क्रमांकांवरही तर ‘कोस्टल रोड’च्या ‘पॅकेज-2’करिता वरळी डेअरीसमोर उभारण्यात आलेल्या नियंत्रणात कक्षाचा आपत्कालीन क्रमांक 022–2490-0359 असा आहे.

अविक पांजा व आजाद सिंग या नियंत्रण कक्षाच्या संपर्क अधिकाऱ्यांशी अनुक्रमे 9874-442-300 व 9819-026-595 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर व ‘कोस्टल रोड’च्या ‘पॅकेज-4’करिता प्रियदर्शिनी उद्यानाजवळ उभारण्यात आलेल्या नियंत्रणात कक्षाचा आपत्कालीन क्रमांक 022–2362-9410 असा आहे.

 संदीप सिंग व उत्पल दत्ता या नियंत्रण कक्षाच्या संपर्क अधिकाऱ्यांशी अनुक्रमे 9958-899-501 व 9958-793-012 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या