कोटा येथून आलेल्या बीडच्या 43 विद्यार्थ्यांची कोरोनाची चाचणी होणार, स्वॅब गोळा करून तपासणीला पाठवले

594

कोरोना मुक्त असणाऱ्या बीड जिल्ह्यात कोटा येथून आलेल्या 43 विद्यार्थ्यांची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी गुरुवारी सकाळी या विद्यार्थ्याचे स्वॅब घेण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 232 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीडमध्ये आरोग्य विभाग प्रचंड मेहनत घेत असून त्यांना या जिल्ह्यापासून कोरोनाला लांब ठेवले आहे. एक लहानशी चूकही महागात पडू शकते हे माहिती असल्याने जिल्ह्यात मोठी खबरदारी घेतली जात आहे. चेकपोस्ट करडी नजर ठेवली जात असून, जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण 279 जणांच्या चाचणी करण्यात आल्या असून त्यातील 47 स्वॅबचाचण्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

आपली प्रतिक्रिया द्या