हरयाणात 30 जूनपर्यंत च्युईंगगमच्या विक्रीवर बंदी

505

थुंकल्याने होणारा कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी हरयाणा सरकारने 30 जूनपर्यंत च्युईंगगमच्या विक्रीवर बंदी घातली आहे. याशिवाय पान गुटखाच्या विक्रीवर घालण्यात आलेली बंदी कठोरतेने राबवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाग्रस्त शिंकला, खोकला किंवा थुंकला तर त्याच्या शिंतोड्यांमुळेही निरोगी माणसाला कोरोनाची लागण होऊ शकते. कोरोनाग्रस्ताने चघळलेले च्युईंगगम थुंकले तर त्यातूनही कोरोनाची लागण होऊ शकते असं हरयाणाच्या अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटले आहे.

हरयाणामध्ये जवळपास 13 हजार लोकांना कोरोना झालाय अथवा नाही हे जाणून घेण्यासाठी निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. हा आकडा वाढू नये म्हणून च्युईंगगमच्या विक्रीवर कठोरपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हरयाणामधेय पानमसाला, गुटखा यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर ही बंदी कठोरपणे राबवण्याचं सरकारने ठरवलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या