Corona Virus Live Update – कृपा करून शिस्त पाळा, ती पाळणं गरजेचं आहे – मुख्यमंत्री

6321

कोरोना विषाणूमुळे जगभरात चिंता निर्माण झाली आहे. प्रत्येक देश या संकटाशी झुंजत असून. हिंदुस्थानात कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 च्या जवळ येऊन पोहोचला आहे. जगभरात या विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा एकत्रित आढावा आपल्याला याठिकाणी वाचायला मिळू शकेल.

 • मी दररोज सांगतोय की बाहेर पडू नको. पण निगेटिव्ह विचार ठेवू नका, घरातलं वातावरण आनंदी ठेवा

 • घराबाहेर संकट आहे घऱात नाही. त्यामुळे आनंदी राहा, आपण फक्त दिलेल्या सूचना पाळा
 • पुढचे १५ ते २० दिवस कसोटीचे आहेत त्यामुळे घरात रहा
 • कोरोनाची लक्षण दिसल्यानंतर लपवू नका, हे लपविण्याचं काम नाही.
 • कृपा करून स्वत:हून पुढे या, जेणेकरून आपण हा विषाणू जागच्या जागी थोपवू शकतोय
 • मुला बाळांची पर्वा न करता पोलीस कर्तव्य बजावत आहेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 • आपण या टप्प्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश केलाय
 • शिर्डी संस्थानाचे, सिद्धिविनायक संस्थानाचे धन्यवाद
 • इतर राज्यातील लोकांची व्यवस्था करतो आहोत, ही आपली संस्कृती आहे
 • लोकं वेगवेगळ्या मार्गाने आपल्या गावी जातायत. हे व्हायला नको.
 • कृपा करून शिस्त पाळा, ती पाळणं गरजेचं आहे – मुख्यमंत्री
 • काहीही कारण नसताना लोकं झुंबड करत आहेत. गर्दी टाळायची आहे
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोरोना व्हायरसबाबत निवेदन
 • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नीटची परिक्षा स्थगित

 

 •  महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 153 वर, मुंबईत आढळले पाच रुग्ण

 • मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 86 वर
 • केरळमध्ये एका दिवसात आढळले 39 रुग्ण,  रुग्णांची संख्या 176 वर

 • जम्मू कश्मीरमध्ये चार जणांना कोरोनाची लागण
 • युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण

 • गेल्या 24 तासात हिंदुस्थानात कोरोनाचे 75 रुग्ण आढळले, चार जणांचा मृत्यू

 • देशाअंतर्गत विमानसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार

 • महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 147वर. सांगलीत आढळले 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

 • कर्नाटकात 10 महिन्याच्या मुलीला कोरोनाची लागण

 • दारू न मिळाल्याने मजूराची आत्महत्या
 • कोरोनामुळे संपूर्ण हिंदुस्थानात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे बाजारात फक्त अन्नधान्य मिळत आहे. दारू न मिळाल्याने केरळमध्ये एका 38 वर्षीय मजुराने आत्महत्या केली आहे. दारू न मिळाल्याने हा मजूर निराश झाला होता.

 • पुणे जिल्ह्यात बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 10 झाली

 

 • अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठीजिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आदेश दिले आहेत
 • नागपूरमध्ये 59 जणांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरवली, तिघांना अटक
 • सर्व डॉक्टरांना विनंती आहे की सर्वांनी आपली वैद्यकीय सुविधा सुरू ठेवावी
 • खासगी रुग्णालये, दवाखाने डॉक्टरांनी भीतीपोटी बंद केले आहेत
 • जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या
 • 19 जण बरे झाले असून, बरे होणाऱ्यांचा आकडा वाढायला लागला आहे
 • राज्याच्या सध्याच्या घडीला 135 कोरोनाग्रस्त आहेत
 • Tracing, Testing, Treatment या साठी जनेतेने सहकार्य करावे
 • इथल्या रुग्णांमुळे होणारं संक्रमण थांबवणं गरजेचं आहे
 • जे रुग्ण आहेत त्यामध्ये वाढ होऊ नये याची काळजी घ्यायची आहे
 • आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निवेदन

Posted by Rajesh Tope on Thursday, March 26, 2020

 • ईकॉमर्स कंपन्यांना मुंबई पोलिसांचे आवाहन. अत्यावश्यक वस्तूंच्या घरपोच सेवेत अडचणी येत असल्याच खालील क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले

 • नवी मुंबई पोलिसांनी अत्यावश्यक सेवांसाठी पासेस द्यायला सुरुवात केली

 • फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून निवेदन करणार
 • राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे थोड्याच वेळात निवेदन करणार

 • CRR मध्येही कपात करण्याचा निर्णय

 • बँकांनी चलन तरलता कायम रहावी यासाठी प्रयत्न करावे
 • एसपीसीच्या 6 मधल्या 2 सदस्यांनी याला विरोध केला होता
 • रेपो रेट 75 बेसिस अंकांनी कमी करण्याचा निर्णय एकमताने झाला नाही
 • रिव्हर्स रेपो रेट आता 4 ट्क्क्यांवर आला
 • रिव्हर्स रेपो रेट 90 बेसिस अंकांनी कमी केला
 • रेपो रेट आता 4.4 टक्क्यांवर आला
 • रेपो रेट 75 बेसिस अंकांनी कमी केला
 • रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांनी पत्रकार परिषदेऐवजी निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला
 • सकाळी 9 ते 10 एक भाग आणि रात्री 9 ते 10 दुसरा भाग दाखवणार
 • 28 मार्च पासून प्रसारणाला सुरुवात होणार
 • लोकाग्रहास्तव रामायणाचे पुन:प्रसारण करण्याचा निर्णय
 • नागरिकांनी घरात थांबावे यासाठी ‘राम’बाण  इलाज
 • पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 32 झाली असून त्यातील 5 जण पूर्णपणे बरे झाले आहेत
 • पुण्यातील आणखी तिघे जण कोरोनातून बरे झाले, आज घरी परतण्याची शक्यता
 • अहमदपूर इथे शिवसेनेच्या वतीने बंदोबस्तावरील पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती
 • लातूर जिल्ह्यातील 45 पैकी 43 संशयित कोरोनाग्रस्तांचे अहवाल निगेटीव्ह, उर्वरीत दोघांचे अहवाल आज प्राप्त होणार
 • कोरोनामुळे लातूर जिल्ह्यातील SBI च्या सर्व शाका सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत खुल्या राहणार
 • लातूर जिल्हयातील बी-बियाणे, किटकनाशक व खते यांची विक्री केंद्रे चालू ठेवावीत- जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांचे आदेश
 • एकत्र या, आक्रमकतेने मुकाबला करा असे जागतिक आरोग्य संघटनेने सगळ्या देशांना आवाहन केलं आहे, असं न झाल्यास लाखों लोकांचा मृत्यू होईल अशी भीतीही वर्तवली आहे
 • राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज देशभरातील सगळे राज्यपाल आणि नायब राज्यपाल यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार

 • शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार

 • अमेरिकेमध्ये किमान 1,000 जणांचा मृत्यू झाल्याचे न्यूयॉर्क टाईम्सने वृत्त दिले आहे
 • अमेरिकेमध्ये चीन किंवा इटलीपेक्षाही जास्त कोरोनाग्रस्त असल्याचे वृत्त

 • अमेरिकेमध्ये 81,321 जणांना कोरोनाची लागण
आपली प्रतिक्रिया द्या