Corona Virus एका दिवसात 250 जणांचा मृत्यू, इटलीमध्ये हाहा:कार

7663

इटलीमध्ये शुक्रवारी अवघ्या चोवीस तासात 250 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब ही आहे की जगभरात शुक्रवारी Corona Virus मुळे सर्वाधिक मृत्यू हे इटलीमध्येच झाले आहेत. हा आकडा चीनपेक्षाही अधिक असल्याने इटलीमधले सगळे नागरीक धास्तावले आहेत. चीनमधल्या वुहानमध्ये आतापर्यंत या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळत होते, मात्र इटलीमध्ये या आजाराची ज्या वेगाने लागण होत आहे ते पाहिल्यानंतर इटली हे दुसरं वुहान होतंय की काय अशी भीती वाटायला लागली आहे.

italy-milan-escalator-coron

कोरोना व्हायरसमुळे गेल्या 24 तासात सर्वाधिक मृत्यू होण्याचे जर्मनीतील प्रमाण हे चीनपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. यामुळे तिथली परिस्थिती ही चिंताजनक बनली आहे. इटलीमध्ये या आजारामुळे दगावणाऱ्यांची एकूण संख्या ही 1,266 झाली असून तिथे या आजाराची 17,660 जणांना लागण झाली आहे. चीनमध्ये या आजाराने दगावणाऱ्यांची एकूण संख्या ही 3,176 इतकी असून तिथे तब्बल 80 हजार 800 जणांना या आजाराची लागण झाली आहे. आकड्यांवर नजर टाकल्यास चीननंतर या आजाराचा सगळ्यात जास्त त्रास हा इटलीलाच झाल्याचे दिसते आहे.

कोरोना विषाणूचा उद्रेक हा सर्वात पहिल्यांदा चीनमध्ये  झाला होता. आजाराचं हे लोण आता युरोपातील देशांमध्ये पसरायला लागले असून युरोप हे या आजाराचं केंद्र बनत चाललाय की काय असं वाटायला लागले आहे. फ्रान्समध्ये गेल्या 24 तासात 18 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. यामुळे फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा एकूण आकडा 79 झाला आहे. याव्यतिरिक्त स्पेनमध्ये या आजाराने आतापर्यंत 122 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये 4,334 जणांना या आजाराची लागण झाल्याचेही निदान करण्यात आले आहे. या विषाणूची लागण झाल्याने इंग्लंडमध्ये 10 जणांचा तर जर्मनीमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

इटलीमध्ये हा आजार ज्या वेगाने पसरत चालला आहे. हे पाहून चीनने आपले डॉक्टर तिथे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. इटलीमध्ये जवळपास 60 हजार हिंदुस्थानी नागरीक राहात असून त्यातील विद्यार्थी आणि हिंदुस्थानी नागरिकांशी संपर्क साधण्याचा, त्यांना मदत पोहचवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या