कोरोनाबाधित महिलेसह अँम्ब्युलन्समधून प्रवास करणाऱ्या कोल्हापुरातील तरुणाचा अहवाल निगेटीव्ह

377

कोल्हापुरातील एका तरुणाने कोरोनाबाधित महिलेसह कराड येथून अँम्ब्युलन्समधून प्रवास केला होता. या तरुणाच्या घशातील द्रावाची चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे निदान करण्यात आले आहे. या तरुणाने आरोग्य विभागाला आपण कोरोनाग्रस्तासोबत अँम्ब्युलन्सने प्रवास केल्याची माहिती दिली होती. या तरुणासह एकूण 7 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोल्हापूरात चार जण करोना पॉझिटीव्ह
लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात मुंबई,पुणे आदी शहरांतून जिल्ह्यात आणखी 2 हजार 413 जण आल्याचे कळाले आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात मुंबई,पुणे आदी शहरांतुन आलेल्यांची एकुण संख्या 79 हजार 905 झाली आहे. यामध्ये 67 हजार 935 जणांचे 14 दिवसांचे वैद्यकीय निरिक्षण पुर्ण झाले असुन, अजुनही यातील 11 हजार 970 जण घरी देखरेखीखाली आहेत. परदेशातून जिल्ह्यात आलेल्या 830 पैकी 813 जणांचे वैद्यकीय निरिक्षण पुर्ण झाले असून, केवळ 7 जण वैद्यकीय निरिक्षणाखाली आहेत. सध्या कोल्हापुरात एकुण 634 संशयितांवर उपचार सुरू आहेत.

संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणा-यांचे स्वॅब घेणार,सक्तीने संस्थात्मक अलगीकरण करणार
अजुनही वेगवेगळ्या मार्गाने काहीजण जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरुन गावात,शहरात येत आहेत.संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या अशा व्यक्तींचे सक्तीने संस्थात्मक अलगीकरण करुन त्यांचा स्वॅब घ्या, याला विरोध करणाऱ्या विरोधात पोलीस कारवाई करा अशा स्पष्ट सूचना आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या