मुंबईत सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क बंधनकारक, न घातल्यास अटक होणार

724

कोरोनाविरूद्ध अधिक आक्रमकतेने मुकाबला करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक असो अथवा कार्यालयीन काम, कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी जात असताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न घातल्यास संबंधित व्यक्तीला अटकही होऊ शकते. मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हे आदेश जारी केले आहेत. राज्यात लागू करण्यात आलेल्या ‘साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897’ नुसार ‘महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 2020’ अन्वये महापालिका आयुक्त यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या