कोरोनामुळे विदर्भ- मराठवाड्याची सीमा सील केली, तपासणीशिवाय प्रवेश नाही

विस्तीर्ण क्षेत्रफळ असलेल्या नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कठोर उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील यवतमाळ सीमेवर तपासणी छावणी सुरु करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. यवतमाळवरून जे प्रवासी नांदेड जिल्ह्यात येत आहेत त्यांची या छावणीत अँटिजेन कोरोना चाचणी केली जाणार आहे. जे नागरीक बाधित आढळतील त्यांना उपचारासाठी ते जेथून आले आहेत तिथे परत पाठविण्यात येणार आहे. ज्या नागरिकांचे चाचणी अहवाल निगेटीव्ह असतील त्यांनाच नांदेड जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे.

माझी जबाबदारी भक्कम पार पाडण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या यवतमाळ सिमेवर तपासणी छावणी

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे…

Posted by Dr. Vipin, IAS, Collector, Nanded on Monday, February 22, 2021

कोरोना बाधितांवर आवश्यकतेनुसार वेळीच उपचार करणे सोईचे जावे यासाठी हा निर्णय घेतल्याचे नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले आहे. चाचणी, पडताळणीसाठी सुरू करण्यात आलेल्या छावणीद्वारे यवतमाळ येथून येणाऱ्या प्रवाशांचे वेळप्रसंगी समुपदेशनही छावणीच्या पथकातील सदस्य करतील. कोरोना चाचणी करता यावी यासाठी एक वैद्यकीय पथक या ठिकाणी काही दिवस ठेवले जाईल असे इटनकर यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकांनी जर काळजी घेऊन अनावश्यक प्रवास टाळले तर निश्चितच आपण सर्व मिळून कोरोनाच्या या प्रादुर्भावाला रोखू शकतो असे ते म्हणाले. लोकांनी विनाकारण घराबाहेर पडणे थांबवावे असे म्हणतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या