चंद्रपूरवासी टेन्शनमधे! जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 9 ने वाढला

789

चंद्रपुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या गुरुवारी सकाळी 9 ने वाढली आहे. कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहून चंद्रपूरवासी चिंतेत पडायला लागले आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत एकही रुग्ण नसलेल्या चंद्रपुरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढायला लागल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 12 झाली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हे 9 रुग्ण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. यापैकी 5 जण वैद्यकीय महाविद्यालयात चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. तर 4 जण वन अकादमीच्या नव्या इमारतीत संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जे रुग्ण सापडले आहेत ते सगळे चंद्रपुरात बाहेरून आलेले आहेत. आतापर्यंत सापडलेले रुग्ण हे मुंबई, ठाणे, मालेगाव, दिल्ली, हैदराबादवरून आल्याची माहिती मिळाली आहे. रुग्ण संख्या जरी वाढत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या