पिंपरीत आणखी एक कोरोना पॉझिटीव्ह, रुग्णांची संख्या दहावर

449

पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी आणखी एक महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. या महिलेचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे शहरातील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दहावर पोहचली आहे.ही महिला कोणाच्या संपर्कात आली होती, अथवा ती विदेश प्रवासावरून आली होती हे मात्र अजून कळू शकलेलं नाहीये. प्रशासनाकडून ही माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्यांनाही महापालिका रुग्णालयात दाखल केले आहे. या महिलेचा चाचणी अहवाल बुधवारी रात्री मिळाला. यामध्ये महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. वायसीएम रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात महिलेवर उपचार सुरु आहेत. या महिलेच्या संपर्कात आलेले आणि ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेल्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात येणार आहेत.

दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमातून आलेल्यांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मुले बाधित झालेल्या कोरोनाग्रस्तांना रुण्यालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील लोकांनाही महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचेही नमुने आज तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. शहरात 10 मार्चपासून आजपर्यंत 21 रुग्ण आढळले असून त्यापैकी बारा जण बरे झाले आहेत. नऊ बाधित रुग्णांवर वायसीएम रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु होते. त्यामध्ये आज आणखी एकाची भर पडली आहे. त्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दहावर पोहचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या