रत्नागिरीत आणखी 2 कोरोनाग्रस्त सापडले, खबरदारीचा उपाय म्हणून म्हाप्रळ, लाटवण मार्ग पूर्णपणे बंद

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुरुवारी कोरोनाचे 2 रुग्ण सापडले आहेत. हे दोघेही जण मुंबईहून आले असून त्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात आले होते. गुरुवारी त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये सलग पाचव्या दिवशी कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. गुरुवारी सापडलेल्या रूग्णांपैकी एक रूग्ण चिपळूण तालुक्यातील कामथे येथील आहे तर दुसरा दुसरा रूग्ण हा खेड तालुक्यातील कळंबणी येथील आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 17 झाली आहे. यातील 5 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी आता फक्त कशेडी मार्गानेच प्रवेश
कोरोना बाधित क्षेत्र असलेल्या पुणे-मुंबईतून रत्नागिरी जिल्हयात येणाऱ्या नागरिकांची तपासणी होणे आवश्यक आहे. या दोन शहरातून येणारे नागरीक कशेडी घाटासोबतच म्हाप्रळ व मौजे लाटवण येथील मार्गांचाही वापर करतात. वापर करतात. या तीनही मार्गांवर नागरिकांची तपासणी करणे शक्य नसल्याने गुरुवारपासून म्हाप्रळ व मौजे लाटवण येथील मार्गावर कोणालाही प्रवेश द्यायचा नाही असे आदेश देण्यात आले आहेत. हे मार्ग बंद होत असल्याने मंडणगड तालुक्यातून अत्यावश्यक सेवा वाहने व मालवाहू वाहने यांच्यासाठी पर्यायी मार्ग तहसीलदार मंडणगड व पोलिस निरीक्षक मंडणगड यांच्या समन्वयाने निश्चित करावा असेही आदेशात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या