चिंताजनक बातमी, रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा दहावा बळी

425

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 10 पर्यंत पोहोचली आहे.  सोमवारी रात्री उशिरा 10 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. एका व्यक्तीचा निधनानंतर कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे त्याचेही नाव या दहा कोरोनाग्रस्तांच्या यादीत सामील आहे. या व्यक्तीचे निधन कोरोनामुळे झाले असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या 10 झाली आहे.  जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा आता 297 झाला आहे. सोमवारी रात्री  ज्या 10 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत त्यांच्यातील 9 रुग्णांवर संगमेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्या मात्र आता पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 116 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या