कोल्हापुरात उभी राहिली स्वॅब केबिन, नमुने घेणाऱ्यांना होणारा संसर्गाचा धोका टळणार

352

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये स्वॅब केबिन उभारण्यात आली आहे. अशा पद्धतीची केबिन पहिल्यांदाच राज्यात उभारण्यात आली आहे. नमुने गोळा करण्यासाठी वापरण्यात येणारी ही केबिन दक्षिण कोरियामध्ये कार्यरत असून त्याच धर्तीवर ही केबिन कोल्हापुरात उभारण्यात आली आहे. संशयित रुग्णाचा स्वॅब घेताना वैद्यकीय अधिकारी पीपीई किटचा वापर करतात. मात्र तरीही कोरोनाची लागण होण्याचा धोका टळत नाही. हा धोका टळावा यासाठी स्वॅब केबिनची रचना करण्यात आलेली आहे.

वैद्यकीय अधिकारी हे केबिनच्या एका बाजूला असतात आणि रुग्ण हा दुसऱ्या बाजूला असतो. दोघांच्यामध्ये पारदर्शक भिंत असते. डॉक्टर हातात ग्लोव्ह्ज चढवून पारदर्शक भिंतीतून त्यांचे हात रुग्णापर्यंत पोहचावे यासाठी असलेल्या जागेतून बाहेर काढतात आणि रुग्णाच्या घशातील द्राव तपासणीसाठी गोळा करतात. या पद्धतीमुळे रुग्णाच्या शरीराच्या अन्य भागांना होणार्‍या स्पर्श आपोआप टळणार आहे. शिवाय सतत पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट बदलण्याचा प्रश्नही निकालात निघाला आहे. या केबिनचे रोज निजर्तुंकीकरण केले जाणार आहे. चार दिवसात १३२ डिग्रीचे स्टीम जनरेटर त्यात वापरले जाणार आहे. त्यामुळे वाफेद्वारेच व्यक्ती निजर्तुंक होऊन बाहेर पडणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या