हिंदुस्थानातील कोरोना ‘बहुरुपी’, जगभरातील शास्त्रज्ञ चिंतेत, लस बनवण्याच्या निर्मितीला बसू शकतो धक्का

2982

हिंदुस्थानातील कोरोना ‘बहुरुपी’ असल्याची धक्कादायक बाब उघड झाल्याने जगभरातील शास्त्रज्ञ, संशोधक चिंताग्रस्त झाले आहेत. कोरोनावर प्रभावी लस बनवण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत, पण कोरोनाच्या या रूप बदलामुळे लस निर्मितीलाच धक्का बसू शकतो, अशी त्यांना भीती आहे.

केरळमधील नॅशनल इन्स्टिटय़ूट वायरोलॉजीमध्ये जानेवारीत एका कोरोना रुग्णाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. ते  आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांसमोर मांडण्यात आले. त्यावेळी कोरोनाचे स्वरूप बदलत असल्याची बाब लक्षात आली. अभ्यासाअंती कोरोना विषाणूच्या स्पाईक प्रोटिनमध्ये बदल झाल्याचे दिसून आले आहे. हा विषाणू शरीरातील काही भागांना बांधून उर्वरित अवयवांवर हल्ला करत असल्याचे दिसून आले आहे.

विलग राहून… सुपरहिरो बना

कोरोनाशी लढाईत मुंबई महानगरपालिकेला प्रत्येक मुंबईकराची साथ महत्त्वाची आहे. तपासण्या सुरू आहेत, उपचार युद्धपातळीवर मिळत आहेत पण कोरोनाची साखळी तोडणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी हार्ंडग्जद्वारे जनजागृती सुरू केली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीपासून पेडर रोडच्या उच्चभ्रू वसाहतींमध्येही ही हार्ंडग्ज मुंबईकरांना जागरूक करत आहेत. विलग राहून सुपरहिरो बना…असे सांगतानाच ‘घरी रहा, सुरक्षित रहा, जंतुसंसर्गाची साखळी तोडा’ असे कळकळीचे आवाहन त्याद्वारे करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या