कोस्टा ल्युमिनोसा मुंबईच्या धक्क्याला

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई, कोचीन आणि मालदीव येथे नियमित क्रूझ सेवा उपलब्ध करून देणाऱ्या कोस्टा क्रूझेस या क्रूझ कंपनीचे कोस्टा ल्युमिनोसा हे जहाज मुंबईच्या धक्क्याला लागले आहे. कोस्टा ल्युमिनोसा जहाजात 1130 केबिन असून तीन हजार प्रवाशांची क्षमता आहे. क्रूझवर 120 मुरानो काचेची झुंबरं आहेत. तिचा एक थांबा मुंबई बंदरात असेल.  हिंदुस्थानात क्रूझ सफरीची वाढती मागणी आहे. 8 नोव्हेंबर 2019 रोजी कोस्टा व्हिक्टोरियाचा मुंबईतून पहिला प्रवास सुरू होईल. कोस्टा व्हिक्टोरिया क्रूझवर 14 डेक, तीन स्विमिंग पूल, चार जॅकुझी, 10 बार, पाच रेस्टॉरंट, कॅसिनो, चित्रपटगृहे, डिस्को आणि बॉलरूम आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे अद्ययावत क्रूझ टर्मिनल उभारण्यात येणार आहे. मोठी कोस्टा जहाजे तिथे थांबतील, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी दिली.