
पत्नीला उंदीर मारण्याचे औषध पाजणाऱया पतीचा हेतू तिला जिवे मारण्याचा नव्हता, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. हा निर्वाळा देत न्यायालयाने पतीची हत्येचा प्रयत्न या गंभीर आरोपातून सुटका केली. नामदेव चोरमुळे असे या आरोपीचे नाव आहे. पत्नीला विष पाजल्याच्या गुह्यासाठी नामदेवला सोलापूर सत्र न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली. त्याविरोधात नामदेवने अपील याचिका केली होती. ऍड. सिद्धांत देशपांडे यांनी नामदेवची बाजू मांडली. ही शिक्षा रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.
न्या. सारंग कोतवाल यांच्या एकल पीठाने ही मागणी मान्य केली. सदोष मनुष्य वधासाठी प्रयत्न या गुह्यासाठी न्यायालयाने नामदेवला सात वर्षांची शिक्षा ठोठावली. गेली पाच वर्षे नामदेव कारागृहात आहे. त्याने शिक्षेचा पुरेसा कालावधी पूर्ण केला आहे. त्यामुळे नामदेवची सुटका करण्यात यावी, असे आदेश न्या. कोतवाल यांनी दिले.
मारण्याचा हेतू नव्हता
ही घटना 2015 मध्ये घडली. नामदेव व त्याच्या पत्नीचे भांडण झाले. त्यावेळी त्याने पत्नीला विष पाजले. पत्नीने नामदेव विरोधात तक्रार केली. त्याआधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. नामदेवविरोधात खटला चालला. सत्र न्यायालयाने त्याला दहा वर्षांची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाने निःसंदेह गुन्हा सिद्ध केला नाही. पत्नीला जीवे मारण्याचा नामदेवचा हेतू नव्हता, असा युक्तिवाद ऍड. अभिषेक अवचट, ऍड. महेश सदाफल यांनी केला.
z पोलिसांनी सबळ पुराव्यानिशी नामदेवचा गुन्हा सिद्ध केला आहे. विष पाजून त्याने पत्नीला मारण्याचाच प्रयत्न केला होता. सत्र न्यायालयाने त्याला ठोठावलेली शिक्षा योग्य आहे, असा दावा सरकारी वकील रंजना हुमाने यांनी केला होता.
पत्नीला रुग्णालयात नेले
विष पाजल्यानंतर पती पत्नीला रुग्णालयात घेऊन गेला. पत्नी शुद्धीवर आली तेव्हा पती तेथे होता. पतीने ठरवले असते तर तो पत्नीच्या जीविताला धोका होईल, असे कृत्य करू शकत होता. पण त्याने तसे केले नाही. भांडण झाल्यानंतर पतीने पत्नीला विष पाजले. ही कृती अचानक घडली. ठरवून किंवा कट रचून ही कृती पतीने केलेली नाही. हा हत्येचा प्रयत्न असू शकत नाही. पत्नीचा मृत्यू झाला असता तर पतीला सदोष मनुष्यवधाची शिक्षा झाली असती. परिणामी सदोष मनुष्य वधासाठी प्रयत्न या गुह्यासाठी नामदेवला शिक्षा दिली जाऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
– घटना घडल्यानंतर उपाध्याय यांच्या पत्नीचा जबाब पोलिसांनी घेतला होता. याचिका दाखल झाल्यानंतर उपाध्याय यांच्या पत्नीचा पुरवणी जबाब घेण्यात आला. महिला अधिकाऱयासमोर हा जबाब घेण्यात आला. केस ओढले व हात धरून ओढून नेले, असे उपाध्याय यांच्या पत्नीने सांगितले. विनयभंगाबाबत काहीही सांगितले नाही. त्यामुळे विनयभंगाचा गुन्हा नोंदवलेला नाही, असे सरकारी वकील कुमार सस्ते यांनी न्यायालयाला सांगितले.