जगभरात 2020-21 साली कोरोनाच्या महामारीने हाहाकार माजला होता. मात्र पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. अमेरीकेपासून साऊथ कोरीयापर्यंत जगभरातून अनेक भागात कोविडच्या केस समोर येऊ लागल्या आहेत. यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रिवेंशनच्या अंदाजानुसार, अमेरीकेतील 25 राज्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढले आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेरीकेच्या रुग्णालयामध्ये यावेळी 4 हजार हून अधिक कोविड संक्रमित दाखल आहेत, तर साऊथ कोरियामध्ये कोरोनाची बरीच प्रकरणे समोर आली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, 24 जूनपासून 21 जुलैपर्यंत 85 देशांमध्ये दर आठवड्याला SARS-CoV-2 चे जवळपास 17 हजार 358 चाचण्या गेल्या आहेत. अशावेळी तज्ज्ञांनी सावधतेचा इशारा दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, हिंदुस्थानात जून पासून जुलैपर्यंत कोरोनाचे 908 प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हिंदुस्थानची परिस्थीती अन्य देशांप्रमाणे गंभीर नाही आहे. मात्र सावध राहणे गरजेचे आहे. कोरोना पुन्हा एकदा येतोय आणि त्याने मृत्यूही वाढत आहेत. त्यामुळे स्थिती चिंताजनक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगात या विषाणूने जवळपास 26 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 11 टक्के कोरोनाच्या प्रकरणात वाढ झाली आहे.
यावेळी ओमिक्रॉनशी संबंधित कोरोनाचे KP प्रकार चिंता वाढवत आहे. ओमिक्रॉनची ओळख जगात पहिल्यांदा जानेवारीमध्ये झाली. हिंदुस्थानात, KP.2 प्रथम डिसेंबर 2023 मध्ये ओडिशामध्ये सापडला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कोविड डॅशबोर्डवरून असे दिसून आले आहे की देशातील अनेक राज्यांमध्ये 279 सक्रिय प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आसाम, नवी दिल्ली, गुजरात, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.
संक्रमणापासून वाचण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या
हात स्वच्छ ठेवा, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, सामाजिक ठिकाणी अंतर राखा, सर्दी खोकला असल्यास मास्क वापरा, पौष्टीक आहार घ्या, पुरेशी झोप आणि तणाव कमी करण्यासाठी योगा आणि ध्यानधारणा करा. कोरोनाचे लक्षण जावण्यास तत्काळ डॉक्टरांकडे जा.