
गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे प्रशासनाने चिपळूण-पनवेल-चिपळूणदरम्यान अनारक्षित विशेष मेमू गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या बुधवार, 3 सप्टेंबर आणि गुरुवार, 4 सप्टेंबर रोजी धावणार आहेत. चिपळूण-पनवेल मेमू (गाडी क्रमांक 01160) सकाळी 11.05 वाजता चिपळूणहून सुटेल आणि दुपारी 4.10 वाजता पनवेलला पोहोचेल तर पनवेल-चिपळूण मेमू (गाडी क्रमांक 01159) सायंकाळी 4.40 वाजता पनवेलहून सुटून त्याच दिवशी रात्री 9.55 वाजता चिपळूणला पोहोचेल.