Video – खड्ड्यात साचलेल्या पाण्याने केली आंघोळ, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याचे अनोखे आंदोलन

नगरमध्ये पावसात अनेक ठिकाणी पाणी साचतं. या विरोधात कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याने अनोखं आंदोलन केले आहे. पावसाच्या पाण्यात बसून त्याच पाण्याने या नेत्याने आंघोळ केली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पाणी साचतं. नगर जिल्ह्यातली अशा प्रकारे पाणी साचल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचे नेते संजय नागरे यांनी अनोखे आंदोलन केले आहे. नागरे शेवगावच्या एका रस्त्यावर गेले. तिथे एका खड्ड्यांत पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यात नांगरे मांडी घालून बसले इतकंच नाही तर हे पाणी अंगावर घेऊन त्यांनी आंघोळही केली.