टाचांना भेगा पडून कडक झाल्या…. हे करून पहा

कोरड्या त्वचेमुळे टाचांचा भेगा पडतात. अशा वेळी काही उपाय घरच्याघरी करता येतात. भेगा पडलेल्या टाचांना नियमितपणे मॉईश्चरायझिंग क्रीम लावा. गरम पाण्यात मीठ किंवा लिंबू टाकून पाय भिजवा आणि हलके घासा. मध लावू शकता. नारळाच्या तेलाने टाचांना हलके मसाज करा.

आहारात योग्य पोषकत्त्वे राहतील, याची काळजी घ्या. आहारात ओमेगा 3, झिंक, व्हिटॅमिन ई याचा वापर करा. टाचांना आधार देणारी किंवा बंद चप्पल वापरा. जर भेगा जास्त खोल असतील किंवा त्यातून रक्त येत असेल, वेदना होत असेल तर डॉक्टरांना दाखवा. टाचांच्या भेगा वाढल्यात त्या अधिक गंभीर होऊ शकतात. म्हणून वेळीच काळजी घ्या.