कोटय़वधी फुटबॉलप्रेमींच्या गळय़ातला ताईत असलेल्या खिस्तियानो रोनाल्डोचे ‘यू टय़ूब’ चॅनल उघडताच अवघ्या 20 तासांत पावणेदोन कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स झाले. हा आजवरचा सर्वात कमी वेळेत कोटय़वधी फॉलोअर्सचा मान मिळवणारा रोनाल्डो पहिलाच फुटबॉलपटू आहे.
फुटबॉल जगतात आजही सर्वात लोकप्रिय असलेल्या रोनाल्डो सोशल मीडियावर नेहमीच धुमापूळ घातलो. पण आज त्याने ‘यू टय़ूब’वर आपली वादळी सुरुवात केली. त्याच्या चॅनलची गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांना उत्सुकता होती आणि तो लाँच होताच. सेपंदाला शेकडोच्या गतीने वाढू लागला. त्याच्या फॉलोअर्सचा वेग इतका होता की, त्याने आपले एक मिलियन म्हणजे दहा लाख फॉलोअर्स अवघ्या 90 मिनिटांतच पूर्ण केले. हा ‘यू टय़ूब’च्या विश्वातला एक महाविक्रम ठरला आहे. इतक्या वेगाने पुणीही एक मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला नव्हता. त्यानंतर त्याच्या चाहत्यांचा वेग विद्युतगती वाढला आणि त्याने दहा तासांत एक कोटींचा टप्पाही गाठला.
बातमी लिहेपर्यंत म्हणजेच 20 तासांत त्याचे यूआर खिस्तियानो हे चॅनल तब्बल 16 दशलक्ष म्हणजे एक कोटी 80 लाख चाहत्यांनी सबस्क्राइब केले होते. त्याच्या पहिल्या व्हिडीओला एक कोटीच्या आसपास ह्यूज लाभले आहेत. हासुद्धा एक विक्रमच आहे. रोनाल्डो सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असून त्याचे एक्सवर 112.5 मिलियन, फेसबुकवर 170 मिलियन, इन्स्टाग्रामवर 636 मिलियन फॉलोअर्स आहेत.