
हिंदुस्थानातील क्रिप्टो एक्स्चेंज कॉईन डीसीएक्समधून हॅकर्सनी तब्बल 380 कोटींवर डल्ला मारला, तर डीसीएक्सच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. तिजोरीत झालेल्या नुकसानीची भरपाई कंपनी करेल, असे म्हटले आहे. कॉईन डीसीएक्समधील पैसे चोरण्यासाठी हॅकर्सनी कंपनीच्या अंतर्गत ऑपरेशनल अकाऊंटला लक्ष्य केले.