क्रिप्टो करन्सीच्या आमिषाने डॉक्टरला 10 लाखांचा गंडा

क्रिप्टो करन्सीच्या ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास 40 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरटय़ांनी 74 वर्षीय डॉक्टरांना 10 लाख 50 हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना 27 ते 29 मे दरम्यान बिबवेवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी डॉ. मधुकर जगताप (वय 74, रा. बिबवेवाडी, काsंढवा रस्ता) यांनी मार्पेटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

डॉ. मधुकर हे बिबवेवाडी काsंढवा रस्ता परिसरात राहायला आहेत. 27 मे रोजी सायबर चोरटय़ांनी त्यांना संपर्क करून क्रिप्टो करंन्सीची लिंक पाठविली. त्याद्वारे मिळणारा नफा वाढीव दाखवून डॉक्टरांचा विश्वास संपादित केला. तुम्हीही पैसे गुंतविल्यास 40 टक्के परतावा देण्याचे आमिष सायबर चोरटय़ांनी डॉक्टरांना दाखविले. त्यानुसार डॉक्टरांनी 10 लाख 50 हजार रुपये ऑनलाईनरित्या वर्ग केले.