श्रीलंकेत बॉम्बस्फोटाची मालिका सुरूच; स्फोटांची संख्या आठवर, कोलंबोमध्ये कर्फ्यु

सामना ऑनलाईन । कोलंबो

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट साखळींची मालिका सुरूच असून आतापर्यंत एकूण 8 स्फोट झाले आहेत. रविवारी सकाळी सहा साखळी स्फोटांनी श्रीलंका हादरली आहे. यातील तीन बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर उर्वरित 3 बॉम्बस्फोट पंचतारांकित हॉटेल्समध्ये झाले आहेत. त्यानंतर दुपारी पुन्हा दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. आतापर्यंत  झालेल्या स्फोटांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 187 वर गेला असून 500 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. स्फोटांमुळे श्रीलंकेत खळबळ माजली असून हल्ल्यामुळे संपूर्ण कोलंबोमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.